breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ, नगरसेविका सविता खुळे यांचा पुढाकार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी रहाटणी येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सविता खुळे आणि भाजप कार्यकर्ते नरेश खुळे यांच्या सहकार्याने अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला.

रहाटणी कोरोनामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत घराघरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नगरसेविका सविता खुळे यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट वाढत असताना रहाटणी येथील जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिका व नगरसेविका सविता नरेश खुळे यांनी प्रयत्न पनाला लावले आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व सुविधा उभारल्या जात आहेत. प्रशासन अहोरात्र मेहनत करीत आहोत. वैद्यकीय उपचार किंवा तपासणीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲन्टीजेन किट उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तींची अॅपमध्ये नोंदणी होणार आहे. इन्फ्रारेड थर्मामिटरने शरिरातील तापमानाची नोंद केली जाणार आहे. पल्स ऑक्सिमिटरने ऑक्सिजन लेवल मोजली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका खुळे यांनी केले आहे.

यावेळी देविदास तांबे, माऊली जाधव, दिपक जाधव, निवृत्ती नखाते, सागर सातपुते, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, निर्स पूनम आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button