रहाटणीतील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाबासाहेबांना अभिवादन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रहाटणीतील क्रांतिसूर्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
बाबासाहेबांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून १२९ व्या जयंती निमित्त महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या अनुयायांनी देखील घरीच राहून बाबासाहेबांना मानवंदना द्यावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
थोर समाजसुधारक आणि विश्वमान्य विचारवंत, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची सखोल चर्चा आजही होते. अर्थात सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य निश्चितच तेवढे महान आहे. पण, त्याचबरोबर डॉ. आंबेडकर हे बहूआयामी नेतृत्व होते. ते अर्थतज्ञ होते, शिक्षणतज्ञ होते. सामाजिक चळवळीचे नेतृत्व करताना त्यांनी पत्रकारिताही केली. त्याचबरोबर कामगार क्षेत्रातील त्यांचा अभ्यास आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे. कामगारांच्या हितासाठी, हक्कासाठी आणि भवितव्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. आज भरकटलेल्या व दिशाहीन झालेल्या व्यवस्थेने बाबसाहेबांचे हे कर्तुत्व लक्षात घ्यायची खरी गरज आहे, असे मत चाबुकस्वार यांनी यावेळी व्यक्त केले.FacebookTwitterPinterest