रस्त्यासाठी आर्किटेक्ट व कंन्सल्टंट नेमण्याचा घाट
पिंपरी – चिखली येथील राधास्वामी आश्रम येथील 24 मीटर डीपी रस्त्याचा दुसरा टप्पा विकसित करण्यासाठी आर्किटेक्ट व सल्लागार नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासंदर्भात ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेचे कोणतेही विकास काम सल्लागार नेमल्याशिवाय मार्गी लागत नाही. पालिकेकडे तज्ञ अभियंते असताना सल्लागार नेमण्याची नस्ती उठाठेव प्रशासनाकडून केली जाते. आता चिखली येथील राधास्वामी आश्रम येथील 24 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी आर्किटेक्ट व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि. 23) झालेल्या स्थायी समितीसमोर ऐनवेळी मांडण्यात आला आहे.
रस्त्यासाठी नेमण्यात येणा-या सल्लागाराला चार टप्प्यांमध्ये शूल्काची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यामुळे विकास कामांच्या नावाखाली सल्लागार आणि ठेकेदारांना पोसले जात आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.