रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील गांधीनगर झोपडपट्टीचे तीस वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण झाले होते. त्याच आधारे आता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियोजन केले आहे. तत्पुर्वी, या रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याची मागणी माजी नगरसेवक कैलास कदम यांनी केली आहे.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गांधीनगर परिसरातील बाधित नागरिकांनी माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 28) महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. कदम यावेळी म्हणाले की, गांधीनगर झोपडपट्टीच्या समोर उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी आहे. रस्ता रुंदीकरण त्या बाजूने व्हावे. विकास कामांना आमचा विरोध नाही. पंरतू, बाधित नागरिकांचे आहे, त्याच परिसरात पुनर्वसन करावे. अशी नागरिकांची मागणी आहे. तसे निवेदन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाकदम यांनी दिले आहे.