breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रमाई आंबेडकर यांचा जन्म दिन प्रबोधन पर्व म्हणून साजरा करा

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष जोगदंड यांची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

रमाई भिमराव आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी जन्म दिन प्रबोधन पर्व म्हणून साजरा करा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहरअध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केली. महापौर उषा ढोरे यांना नुकतेच त्याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी मागणी करण्यात आली. या वेळी राजेंद्र साळवे, मनोज गजभारे उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याला साथ देण्याचे काम रमाई आंबेडकर यांनी देखील केले आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या काळात घरची सर्व जबाबदारी रमाई आंबेडकर यांनी पेलली. त्या रमाईचा योग्य सन्मान महापालिकेने करणे गरजेचे आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारी हा दिवस प्रबोधन पर्व म्हणून साजरा करावा, अशी मागणी जोगदंड यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वामध्ये रमाई भिमराव आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी जन्मदिन प्रबोधन पर्व म्हणून साजरा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महापौर उषा ढोरे यांना देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button