रक्त तुटवड्यामुळे आमदार जगतापांकडून ११ ठिकाणी शिबीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/A-Gallery_15-11.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात ११ ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन; रक्त तुटवड्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदानाचे आवाहन
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवार २९ मार्च ते शुक्रवार ३ एप्रिल या दरम्यान मतदारसंघात वेगवेगळ्या ११ ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून हे रक्तदान शिबीर पार पाडले जाणार आहे. त्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. रक्तदात्यांना संपर्क करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपद्वारे टोकन आणि रक्तदान करण्याची वेळ दिली जाणार आहे. दिलेल्या वळेतच शिबीराच्या ठिकाणी टोकनसह येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनो तुम्ही रक्तदान केल्यास एका गरजू रुग्णाचा जीव वाचणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरात होणाऱ्या रक्तदान शिबीरात या, रक्तदान करा आणि एका गरजू रुग्णाचा जीव वाचवा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
महाराष्ट्रात फक्त ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पुढच्या आठवडाभरात रक्तसाठा वाढला नाही तर अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे समाजाने पुढे येऊन रक्तदान करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हा कठीण काळ लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. रविवार २९ मार्च ते शुक्रवार ३ एप्रिल या दरम्यान सहा दिवस दररोज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबीर होणार आहे. या रक्तदान शिबीराची सविस्तर माहिती घेण्यासाठी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी 8208487723 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील नागरिकांसाठी किवळे, आदर्शनगर येथील साईवर्धन हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी व्हॉट्सअॅपवर टोकन आणि रक्तदानाची वेळ घेण्यासाठी नगरसेविका संगीता भोंडवे(9623087373), नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ (9923947944), प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर (9890924999), बिभीषण चौधरी (9763701833) यांच्याशी संपर्क साधावा.
चिंचवडेनगर, प्रेमलोक पार्क या भागातील रक्तदात्यांसाठी चिंचवडेनगर, भुलेश्वर मंदिराशेजारी पक्षनेते नामदेव ढाके यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी पक्षनेते नामदेव ढाके (9822658325), शहर भाजप उपाध्यक्ष शेखर चिंचवडे (9881490123) यांच्याशी संपर्क साधावा.
चिंचवडगाव, तालेरानगर, केशवनगर या भागातील रक्तदात्यांसाठी चिंचवडगाव, तानाजीनगर येथील कालिका माता मंदिराजवळील सरदार गावडे कमर्शियल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक राजेंद्र गावडे (9822792689), नगरसेवक सुरेश भोईर (9822021892) यांच्याशी संपर्क साधावा.
काळेवाडी, विजनगर या भागातील रक्तदात्यांसाठी काळेवाडीतील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर (9822880397) आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे (9822222400) यांच्याशी संपर्क साधावा.
थेरगावमधील रक्तदात्यांसाठी नगरसेविका अर्चना बारणे यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी काळूराम बारणे (9850982161) आणि तानाजी बारणे (9545047777) यांच्याशी संपर्क साधावा.
थेरगाव, गणेशनगर या भागातील रक्तदात्यांसाठी थेरगावातील संतोष मंगल कार्यालय आणि मोरया मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी माजी नगरसेवक संतोष बारणे (9890901081) आणि माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे (9822270276) यांच्याशी संपर्क साधावा.
वाकड आणि पुनावळे या भागातील रक्तदात्यांसाठी वाकड येथे राम वाकडकर यांचे संपर्क कार्यालय आणि विशाल कलाटे यांचे संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर (9822887505) आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल कलाटे (9822548879) यांच्याशी संपर्क साधावा.
पिंपळेनलिख, वेणूनगर या भागातील रक्तदात्यांसाठी वाकड, कस्पटेवस्ती येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या शेजारील संस्कृती सोसायटी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक संदीप कस्पटे (9923524444) आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड (9673006363) यांच्याशी संपर्क साधावा.
रहाटणी, श्रीनगर आणि तापकीरनगर या भागातील रक्तदात्यांसाठी रहाटणी, नखाते वस्ती येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक चंद्रकांत नखाते (9623784949) आणि प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते (9975757474) यांच्याशी संपर्क साधावा.
पिंपळेसौदागर आणि रहाटणी या भागातील रक्तदात्यांसाठी पिंपळेसौदागर येथील पृथ्वीराज मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते (9975757474) आणि संकेत कुटे (9823495329) यांच्याशी संपर्क साधावा.
पिंपळेगुरव, सुदर्शननगर, जुनी सांगवी आणि नवी सांगवी या भागातील रक्तदात्यांसाठी पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप (8669167115) आणि संजय मराठे (9850209850) यांच्याशी संपर्क साधावा.