योगगुरू रामदेवबाबा यांचे वेब कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पुढाकार
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत योगगुरु रामदेव बाबा यांच्याबरोबर दि. ६ मे २०२० ( बुधवार ) रोजी विशेष योग् वेब कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली . सद्य परिस्थितीत सर्वत्र कोविड -१९ (कोरोना व्हायरस ) प्रसार होत आहे , त्यामुळे मानसिक आरोग्य डळमळीत होऊन त्याचा परिणाम शरीरावर होत आहे . या सर्वातून बाहेर पडण्यासाठी , मनोबल वाढविण्यासाठी, विशेष म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याच्या उद्देशाने या वेब कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले.
या कॉन्फरन्ससाठी डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी . पाटील , उपाध्यक्षा सौ भाग्यश्रीताई पाटील , कुलगुरू डॉ. एन . जे. पवार , सेक्रेटरी डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. सौ. स्मिता जाधव, खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे योग गुरु रामदेव बाबा यांच्याशी संवाद साधला .
या वेब कॉन्फरन्स मध्ये योग गुरु रामदेव बाबा यांनी कोरोना चा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी , निरोगी रहाण्यासाठी विविध प्राणायाम , योगासने तसेच काही आयुर्वेदिक औषधे या बद्दल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले .
विशेष वेब योग कॉन्फरन्स मध्ये प्राचार्य डॉ. गुणवंत येवला (आयु.कॉलेज) यांनी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये कोविड -१९ च्या आयसोलेशन ची व्यवस्था नियोजित आहे. आयसोलेट रुग्णांनी बेड वरच कुठल्या प्रकारची आसने व प्राणायाम करता येतील ? , प्राचार्य डॉ. शर्मा ( होमिओपॅथी कॉलेज) यांनी या परिस्थिती मध्ये मानसिक आरोग्य कसे राखता येईल ?, डॉ. भवाळकर (डीन मेडिकल कॉलेज.) यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्टाफची सुरक्षा , डॉ. गोपालकृष्णन (डीन डेंटल कॉलेज.) यांनी दन्त रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि स्टाफ यांनी प्रतिकार शक्ती कशी वाढवावी ?
उप प्रा. डॉ. प्रशांत खाडे (आयु कॉलेज) यांनी कोरोनाच्या लढवय्यांसाठी आपण काय संदेश द्याल ? असे प्रश्न विचारले ,या संवादाच्या वेळी योग् गुरु रामदेव बाबा यांनी विविध प्राणायाम -अनुलोम -विलोम, भस्रिका कपालभाती ,योगासने आणि आहार कि ज्या मुळे श्वास घेण्याची व फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर बळकट होईल तसेच आयुर्वेदिक काढे गुळवेल इ . वनस्पतींपासून बनविलेले काढे घेणे या विषयी मार्गदर्शन केले.
डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठ ,पुणे आणि युनिटेक सोसायटी यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांचे डायरेक्टर्स , डीन आणि प्रिंसिपल्स या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले.
योग गुरु रामदेव बाबांचे स्वागत कुलपती मा. डॉ पी.डी . पाटील यांनी केले. कुलगुरू मा.डॉ. एन.जे.पवार यांनी विद्यापीठाची माहिती दिली . विश्वस्त मा. डॉ.स्मिता जाधव यांनी आभार मानले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. साफिया फारुकी (डायरेक्टर ऑफ डिस्टन्स लर्निंग ) यांनी केले.
या विशेष योग वेब कॉन्फरन्स चा लाभ ६७००० पेक्षा जास्त दर्शकांनी झूम , वेब लाईव्ह ,फेस बुक लाईव्ह इ माध्यमांद्वारे घेतला