‘यूटयूब’वर व्हिडीओ पाहून भोसरीतील बहीण-भावाने छापल्या नकली नोटा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ad9c3cec-b895-4cc7-be9c-ac10fe87b264_202009490526.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुण्यातील एका भाऊ-बहिणीने पैशासाठी चुकीचा मार्ग निवडला. त्या भाऊ-बहिणींने यूट्यूबवर नकली नोटा बनवण्याचं तंत्र शिकले. या नोटा त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले. सांगण्यात आलंय की, त्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून 100 रूपयांच्या ३४ नोटा छापल्या होत्या.
आरोपींचं नावे सुनीता राय(२२) आणि प्रदीप राय(१८) अशी आहेत. पुणे मिररच्या रिपोर्टनुसार, दोघे बहीण-भाऊ भोसरीच्या भांडी मंडईत गेले होते. जिथे त्यांनी एका दुकानदाराला काही खऱ्या नोटांसह नकली नोटा दिल्या. त्या नोटांची क्वालिटी पाहून दुकानदाराला शंका आली. त्याने जेव्हा सुनीताला याबाबत विचारले तर सुनीता तेथून जाऊ लागली. आजूबाजूच्या लोकांनी तिच्या भावाला पकडलं आणि पोलिसांना याची माहिती दिली.
पिंपरी चिंचवड क्राइम ब्रांचचे अधिकारी उत्तम तांगडे यांनी प्रकरणाचा तपास केला. त्यांनी सुनीतालाही अटक केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला असून त्यांच्या घरातून ३४, २१० रूपयांचं साहित्य ताब्यात घेतलं. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तांगडे यांनी सांगितले की, सुनीताचं लग्न झालेलं आणि ती पतीसोबत राहते. पण तरी सुद्धा ती भावासोबत मिळून यूट्यूबवर व्हिडीओ पाहून नकली नोटा बनवायची टेक्निक शिकत होती. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहे. कारण त्यांना संशय आहे की, यात त्यांच्यासोबत आणखी लोक असू शकतात.