breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवासैनिकांची आयुक्तांसोबत बैठक, बोपखेलवासियांच्या प्रलंबित प्रश्नांना फोडली वाचा

  • बोपखेलवासियांचे प्रश्न सोडविण्याला पहिले प्राधान्य राहील
  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी युवासैनिकांना दिले आश्वासन

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही बोपखेलवासियांचे प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिले आहेत. स्थानिक पदाधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे येथील नागरिकांवर प्रशासनाकडून अन्यय झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी मैदानात उतरले असून महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन बोपखेलमधील नागरिकांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत काल शनिवारी (दि. 19) युवासैनिकांनी खास बोपखेलवासियांच्या प्रश्नांसाठी महापालिकेत स्वतंत्र अशी बैठक घेतली. या बैठकीत युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले यांनी बोपखेलमधील नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांची सुरेख पध्दतीने मांडणी केली. गेल्या सात वर्षांपासून गणेशनगर येथील रस्त्याचा प्रश्न मांडला. रस्त्यासाठी नागरिकांच्या घरांवरून नांगर फिरवण्यात आला. परंतु, आजतागायत 12 मीटर रस्त्याचे काम सुरू झाले नाही.

बोपखेल येथील महादेवाच्या मंदिरासमोरील घाट विस्तृत व्हावा. त्यामुळे मंदिरात पाणी शिरणार नाही. प्रवाहातून येणारा राडारोडा मंदिर परीसरात थांबणार नाही. तसेच, आधुनिक स्माशानभुमी करण्याची मागणी देखील घुले यांनी यावेळी केली. बोपखेल परीसरातील आरक्षित भुखंड ताब्यात घेऊन विकसीत करावेत. असे अनेक प्रश्न मांडून ते तातडीने मार्गी लावण्यात यावेत, असा आग्रह घुले यांनी आयुक्तांकडे धरला. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महापालिका कटीबध्द राहिल. यापुढेही बोपखेलवासियांचे कोणतेही प्रश्न असोत ते सोडविण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन आयुक्तांनी बैठकीत दिले.

बैठकीत आमदार एड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल काटे, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नितिन घोलप, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button