breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

यापुढं कार्यकर्ता हाच माझा पक्ष, आता फक्त लढ म्हणा – शेखर ओव्हाळ

माघार माझ्या रक्तात नाय, जनसेवेसाठी पिंपरीतून फडकावले बंडाचे निशाण

पिंपरी |महाईन्यूज| –  पिंपरी विधानसभा मतदारसंघात बदल घडवणार आहे. लोकांच्या आग्रहास्तव मैदानात उतरणार आहे. गेल्या दोन वर्षापासून लोकांचा जनसंपर्क ठेवून कामे करीत आहे. विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असूनही मला डावलण्यात आले. यामुळे उचलेला विढा, परत ठेवणार नाही. माघार माझ्या रक्तात नाय, जनसेवेसाठी आता फक्त लढ म्हणा, असा नारा माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आज पिंपरीत दिला.

https://www.facebook.com/mahaenews1/videos/130510305002183/

ओव्हाळ पुढे म्हणाले की, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आजपर्यंत काम केले. सामाजिक कार्यात अपेक्षा न ठेवता काम करणारा मी कार्यकर्ता आहे. लोकाच्या आग्रहास्तव पिंपरी विधानसभेतून मी लढणार आहे. माझा जनसंपर्क दांडगा आहे, जनहिताच्या कामाला प्राधान्य देवून लोकांची कामे त्याची पोहोच पावती मतदार मला निश्चित देतील.

तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून इच्छुक असतानाही त्यांनी मला तिकीट दिलं नाही, म्हणून मी थांबणारा कार्यकर्ता नाही. यापुढे कार्यकर्ता हाच माझा, मी त्याच्या जिवावर पिंपरीच्या आखाड्यात उतरणार आहे. कार्यकर्त्यांसह लोकांकडून मला भरभरुन प्रेम मिळत आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे. ते ठरवतील तेच धोरण, तेच बांधतील पिंपरीचे तोरण, असं सांगत शेखर ओव्हाळ यांनी अखेर बंडाचा झेंडा हातात घेतला आहे.

दरम्यान, मला राष्ट्रवादीने तिकीट नाकारले, तरीही मी नाराज झालेलो नाही. उलट अधिक उमेदीने जनतेच्या आर्शिवादाने पिंपरीचे आखाड्यात उतरणार आहे. मी तयारच आहे. अनेकांचे मला फोन येताहेत. यामुळे मी लढणार हे आता ठरलं आहे. माझा कार्यकर्ता, हाच माझा पक्ष असणार आहे. माझ्या कार्यकर्त्यासह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही ओव्हाळ यांनी यावेळी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button