यमुनानगर मधील ठाकरे मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवा
![Yamunanagar Madhil Thackeray Maidanat Balasaheb Thackeray Yancha Putla Baswa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/uttam-kendale-nivdan.jpg)
क्रीड़ा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांची महापौर माई ढोरे यांच्याकडे मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
प्रभाग क्र १३ यमुनानगर त्याच बरोबर या ठिकाणी आधिपासून एक चबूतरा बांधन्यात आलेला आहे. या जागेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा बसविन्यात यावा, अशी मागणी क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केली. महापौर माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे हि मागणी केली.
या वेळी क्रीड़ा सभापती उत्तम केंदळे, भाजपा अध्यक्ष बाबा परब, शिवसेना समन्वयक वसंत भोसले, नारायण पाटील, रूपल माने, कौस्तुभ देशपांडे, भीमा पानमंद,राहुल रांजने, संतोष लश्करे, दादा कोकरे, किरण गंडले, प्रभु बालचंद्रन आदि उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, या वर्षीच्या क्रीड़ा स्थापत्य विभागामार्फत ठाकरे मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धकृती पुतळा उभरण्या बरोबर प.पु गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असणारी स्केटिंग रिंग अद्ययावत पद्धतीने बहुउद्देशीय वापरण्यायोग्य तयार करावी. प्रभाग क्र १३ यमुनानगर मधील प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रीड़ा संकुल पुर्वी पालिकेच्या वतीने विकसित करण्यात आले होते. या मैदानामध्ये नव्याने अनेक कामे करण्याची गरज आहे. प.पु गोळवलकर स्केटिंग रिंग, कै मिनाताई ठाकरे महिला व्यायामशाळा, कै बिंदुमाधव ठाकरे पुरुष व्यायामशाळा, कै गोपीनाथ मुंडे व्यासपीठ,व्हॉलीबाल मैदान, प्रेक्षक गेलरी आदी विविध सुविधा मैदानात आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी आधिपासून एक चबूतरा बांधन्यात आलेला आहे. या जागेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा बसविन्यात यावा. या वर्षीच्या क्रीड़ा स्थापत्य विभागामार्फत ठाकरे मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धकृती पुतळा उभरण्या बरोबर प.पु गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असणारी स्केटिंग रिंग अद्ययावत पद्धतीने बहुउद्देशीय वापरण्यायोग्य तयार करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच दोन्ही व्यायामशाळा, गोपीनाथ मुंडे व्यासपीठ, व्हॉलीबाल मैदान, प्रेक्षक गेलरी आणि तेथील विद्युत व्यवस्था सुद्धा अत्याधुनिक करावी. त्याचप्रमाणे प्रवेशद्वारच्या सिमाभींतिवर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारन्यात यावी. यामुळे प्रभागातिल या मैदानाला शहरात एक वेगळी ओळख निर्माण होईल. या वर्षिच्या अंदाजपत्रकात लेखाशीर्ष व अंदाजपत्रकीय तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे केली.