breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मोशी गावात कडकडीत बंद, पुण्यातील कचरा टाकण्यास विरोध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.  त्याला विरोध करण्यासाठी आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील स्थानिक ग्रामस्थांनी आज (रविवार) मोशीत कडकडीत बंद पाळला.

मोशीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बंदमुळे वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.  मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्रमांक 1/207 सफारी पार्क यासह 12 मीटर व 18 मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी मागितली आहे. राज्य सरकारकडे याबाबतची मागणी केली आहे. महसूल व वन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सरकारकडे विचाराधीन आहे. सफारी पार्कची जागा पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ही जागा पुणे महापालिकेला देऊ नये अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याला कडाडून विरोध केला आहे. जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी 9 जून रोजी गावबंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला होता.

दरम्यान, मोशी गावाच्या शिवारात महापालिकेचा कचरा डेपो आहे. या डेपोतील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मोशीसह चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडीतील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या कचरा डेपोला पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर दुसरीकडे येथे पुण्यातील कचरा आणून टाकला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button