Breaking-newsपिंपरी / चिंचवड
मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे पोलिस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rk.jpg)
पिंपरी – महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५७ वा संजीवन समाधी महोत्सव आज (सोमवार) पासून सुरु झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते झाले.
गुरुवार (दि.२७) डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अध्यात्मिक, सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. प्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, बासरीवादक राकेश चौरसिया, अभिनेते शरद पोंक्षे हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण आहेत, तर ‘आपले घर, पुणे’चे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेषत: मंगळवारी (दि. २५) सायंकाळी एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांचे ‘दहशतवाद, हिंदूस्थानसमोरील एक आव्हान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.