मुळशीतील जांबे गावच्या गणेश गायकवाड यांना ‘बर्थ-डे गिफ्ट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180912-WA0011.jpg)
- सरपंचपदी बिनविरोध निवड घोषित
- भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचा जल्लोष
मुळशी – जांबे गावच्या सरपंचपदी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे गणेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, वाढदिवसादिवशीच निवड झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने गाकवाड यांना ‘बर्थ-डे गिफ्ट’ मिळाले आहे.
मुळशी तालुक्यातील जांबे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ९ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी सरपंचपदी अंकूश पोपटराव गायकवाड यांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मानणारा मोठा गट गावामध्ये कार्यरत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या या गावात विकासकामाच्या माध्यमातून भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने उल्लेखनीय काम केले आहे. नवनिर्वाचित
गणेश सोपान गायकवाड यांनी सलग तीनवेळा ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये सदस्य, त्यानंतर उपसरपंच आता तिस-या पंचवार्षिकमध्ये त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी भैरवनाथ देवस्थान विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे सर्वेसर्वा विजय गायकवाड, माजी उपसरपंच भगवंतराव गायकवाड, अनिल मगर, सूरज गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, उद्योजक तात्या गायकवाड, विष्णू गायकवाड, विकास गायकवाड, सागर गोपाळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित सरपंच गणेश गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुळशी पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर, माजी सभापती सुनिल चांदेरे, सविता दगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार, भारत केसरी पैलवान विजय गावडे, युवा उद्योजक अनुप गायकवाड, युवा उद्योजक स्वप्नील भांडवलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.