breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुंबई-पुणे महामार्गावर एसटी महामंडळाच्या 342 वाहन चालकांवर कारवाई

पिंपरी |महाईन्यूज|

मुंबई – पुणे महामार्गावर नियमाचे उल्लंघन करणा-या एसटी चालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, लेन कटींग करणे, लेनची शिस्त न बाळगण्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या 342 वाहन चालकांवर कारवाई केलीय.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 342 वाहन चालकांवर महामार्ग पोलीस पळस्पे केंद्र आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानी संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात प्रथमच महामार्ग पोलीस आणि परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी चालकांवर ही मोठी कारवाई केली आहे. संयुक्तरित्या ऑनलाईन पद्धतीने ही कारवाई केली आहे. यात महामार्गावर गाडी चालवताना मोबाईल फोन वर बोलणे, लेन कटींग करणे, लेनची शिस्त न बाळगण्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून यामध्ये एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाई, विठाई, हिरकणी आणी इतर बसेसचा सहभाग आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button