breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुधाचा टॅकर उलटल्याने वाहतूक कोंडी

पुणे / महाईन्यूज

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दुध टँकर उलटल्याने द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दुधाची गळती झाल्याने दुध मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. यादरम्यान आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिटपर्यंत चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अपघाताची माहीती मिळताच आयआरबी कंपनीचे देवदुत पथक, बोरघाट पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला घेत दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. अपघातामुळे मार्गावर वाहतूकीची कोंडी झाल्याने वाहतुक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरुन खोपोली मार्गे वळविण्यात आली, मात्र वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

पन्नास ते साठ फुट खोल दरीत कोसळली कार

जुन्या महामार्गावर बोरघाटातील शिंग्रोबा मंदीराजवळ तीव्र उतार व वळणावर साडेदहा वाजण्याच्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने कार पन्नास ते साठ फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button