breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस विचित्र अपघात, ट्रक-कंटेनरच्या धडकेत पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी |महाईन्यूज|

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील पनवेल हद्दीत महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने अघातात पोलीस कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन सोनवलकर असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पनवेल (पळस्पे टॅप) येथे कार्यरत होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल हद्दीत महामार्गावर आज मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकला (MH/ 04/4563) मागून येणाऱ्या कंटेनरने (NL/01/L6497 ) जोरदार धडक दिली. या दोन वाहनांपैकी कंटेनरची धडक दुचाकीवरून गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांनाही लागून त्यांची दुचाकी कंटेनरखाली अडकली.

दुचाकीसह सचिन सोनवलकर कंटेरनरच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. सचिन सोनवलकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, गंभीररित्या इजा झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सचिन सोनवलकर यांच्या अपघातीनिधनामुळे वाहतूक पोलीस दलाने हळहळ व्यक्त केली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान याच्या सह इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन अपघातासंदर्भात माहिती घेतली. पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button