मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पिंपरीत करा, महापाैराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/42502ba4073f7aa2727ee97917f9e835_XL.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज ) – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पिंपरी-चिंचवड अथवा पुणे शहरामध्ये करावे, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात महापौर काळजे यांनी म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पिंपरी-चिंचवड अथवा पुणे शहरामध्ये व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिक, कामगार, सर्व वकील-बार असोसिएशन व पुणे विभाग प्रयत्नशील आहेत. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असल्याने येथे शिक्षणासाठी आलेले नागरिक नंतर नोकरी-धद्यांसाठी इथेच स्थायिक होतात.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसल्याने नागरिकांना मुंबई येथे वारंवार जावे लागते. त्यामुळे जनतेचा नाहक खर्च होतो. वेळही वाया जातो. शहरात खंडपीठ झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. दावे वेळेवर निकाली निघण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे अथवा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.