breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन महापालिका : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची घरा- घरात राष्ट्रवादी मोहीम

पिंपरी | प्रतिनिधी

वर्षभरात होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नवीन कार्यक्रम हाती घेत आहे. सुरुवातीला युवक कार्यकारणीचे प्रमुख उद्दिष्ट संघटन बांधणी आणि बळकटीकरण करण्याचे होते. सदर उद्धिष्ट अत्यंत कमी वेळात सक्रियपणे पूर्ण करण्यात आले. आजपर्यंत युवक कार्यकारणीमध्ये मोठ्या संख्येने सक्रीय पदाधिकारी आहेत.

दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी शहराध्यक्ष मा. श्री. विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्याच संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे मुख्य उद्धिष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार आणि सध्या महानगरपालिकेतील सत्ता पक्ष बीजेपीच्या भोंगळ कारभाराने व भ्रष्टाचाराने मोडकळीस आणलेल्या सार्वजनिक सेवांविषयी जनजागृती करण्यासाठी, प्रभागनिहाय घरा घरात राष्ट्रवादी मोहिमेचा आराखडा तयार करणे होते. याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांनी आजपर्यंत केलेल्या आणि करत असलेल्या विकास कामांविषयीची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचेसुद्धा उद्धिष्ट ठेवण्यात आले होते.

घरा घरात राष्ट्रवादी मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागात ३ ते ४ निरीक्षक देऊन प्रभागनिहाय गृहभेटींची योजना तयार करण्यात येणार आहे. या निरीक्षकांमार्फत प्रभागनिहाय विकास कामांचा आढावा घेऊन, कोणकोणती विकासाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, काही कामे अपूर्ण आहेत आणि काही कामांची सुरुवातही झालेली नाही, याचा तपशील तयार करण्यात येणार आहे. शहर युवक कार्यकारणी याविषयी संपूर्ण आढावा घेऊन प्रभागनिहाय अडखळलेल्या कामांचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आंदोलने करणार आहेत. याचबरोबर संबधित प्रभागातील या मोहिमेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने वेवेगळी जनजागृतीपर आणि पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगणारी पत्रके घरोघरी वाटण्यासाठी तयार केलेली आहेत.

यावेळी पिं. चिं. महानगरपालिका माजी नगरसेवक निलेश आप्पा पांढारकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. विशाल काळभोर, मा. श्री. संदीप लाला चिंचवडे, चिंचवड़ विधानसभा मा.श्री.शामभाऊ जगताप, पिंपरी विधानसभा मा.श्री शेखर काटे आणि सर्व युवक प्रभारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button