breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केली जाते.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.बारणेनी ९३ टक्के उपस्थिती लावत, २८९ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकीत व अतांराकीत असे १०७६ प्रश्न उपस्थित करुन २० खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा.श्रीरंग बारणे यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

तामिळनाडू येथील राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी ही पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. या पारितोषक वितरण सोहळ्यास तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री पी.पी चौधरी, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ.भास्कर राममूर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

लोकसभेतील ५४५ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची देशात अष्टपैलू कामगिरी १६ व्या लोकसभेत ठरली आहे सलग पाच वर्षे पुरस्कार मिळवणारे ते सोळाव्या लोकसभेतील एकमेव खासदार आहेत बारणे यांनी १०७६ प्रश्न मांडले असून २८९ वेळा चर्चेत सहभाग घेतला आहे. तर ९३ % उपस्थिती त्यांची सभागृहात राहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button