breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळचे आमदार सुनील शेळके शरद पवार यांच्यासोबत !

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपा पाठिंब्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवारांनी त्यांची भूमिका पक्षाच्या विरोधात असल्याचे म्हटले असले तरी अजित पवार यांच्यासोबत किती आमदार भाजपसोबत सत्तेत स्थापन होतात हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी मावळचे आमदार शेळके त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र, शपथविधी उरकताच शेळके यांनी मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे आयोजित शरद पवार यांची पत्रकार परिषद गाठली. त्याठिकाणी उपस्थित राहून आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत, हे त्यांनी दाखवून दिले.

यावेळी माध्यमांनी शेळके यांना विचारले असता आपण पक्षाबरोबर आणि शरद पवार साहेबांसोबत राहणार असल्याचे सांगितले. मी उपस्थित होतो परंतु जो काही प्रकार घडत होता, याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, शेळके यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरला होता. त्यावेळीच अजित पवार यांनी ही शेळके यांच्या विजयाची नांदी असल्याचे म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button