मारुंजीत विना परवाना कीटक- नाशकाचे उत्पादन; कंपनीसह संचालकांवर गुन्हा
![Doctors demand bribe for treatment from Mahatma Phule Janaarogya Yojana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शासनाची कोणतीही परवानगी न घेता कीटकनाशकाचे उत्पादन करीत त्याचा साठा व विक्री केल्याप्रकरणी कंपनीसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मारूंजी येथे उघडकीस आला.
अमर सुरेश राऊत (वय 31, रा. पोलाइट कॅसलियम सोसायटी, गायकवाड नगर, आळंदी) याला अटक केली असून, मे. पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा.लि. कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाचे खत निरिक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक रविशंकर सिद्धेश्वर कावळे यांनी फिर्याद दिली.
मारूंजी येथील पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा.लि. कंपनीत आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीच्या कीटकनाशकाचे उत्पादन केले. त्याची साठवणूक व विक्रीही केली. ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास येताच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी येथील कर्मचारी राऊत याला अटक केली असून, संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.