breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मान्सूनपूर्व पुरनियंत्रण प्रभाग दौ-यात पदाधिका-यांकडून नाल्यांची पाहणी; आयुक्तांच्या सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात तीन दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण् प्रभाग दौ-याचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. या दौ-याची सुरुवात निगडी येथील महाराणा प्रताप गार्डन टिळक चौक येथून झाली. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ् पवार, नगरसेवक सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश् भोईर, राजेंद्र गावडे, संजय नेवाळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, करुणा चिंचवडे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप, योगिता नागरगोजे नगरसेविका सुमनताई पवळे, भीमा बोबडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, फ क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, अ क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या तीन दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण् प्रभाग दौ-यात आज अ, ब व फ या प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. तसेच पुढील दोन दिवसात उर्वरित प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात येणार आहे.
पावसामुळे शहरातील होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याकरीता महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येते. ज्या ठिकाणी नाल्यांची साफसफाई अपूर्ण आहे, त्या ठिकाणांची साफसफाई त्वरीत करण्यात यावी, तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, याबाबतच्या सुचना महापौर माई ढोरे यांनी संबधीत विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
पाहणी दौऱ्यामध्ये फ क्षेत्रीय कार्यालय् अंतर्गत् निगडी येथील महाराणा प्रतापसिंग पुतळा चौक मागील नाला, माता अमृतामय विद्यालय मागील नाला, घरकुल आतील चौक वॉटर लाँगीग, शनिमंदिर सी.डी.सी. वर्क नाला, तसेच अ क्षेत्रीय कार्यालय् अंतर्गत् एक्साईड इंडस्ट्रीज जवळ – एमआयडीसी चिंचवड (आरटीटीसी शाहूनगर ते सुग्रास कंपनी ते अडवानी कंपनी नाला, मिल्कमेड बेकरीजवळ एमआयडीसी चिंचवड (हॉटेल बंजारा ते परशुराम चौक ते हायवे टॉवर ते रेल्वेलाईन चिंचवड पर्यंतचा नाला, बालाजी पेट्रोल पंपाजवळ वाहतूक नगर निगडी ( सेक्टर नं. २३ खंडोबा मंदिर ते बालाजी पेट्रोल पंप ते मुंबई पुणे रस्ता नाला, गणेश तलाव से. नं २६ प्राधिकरण, एस.के.एफ. कंपनी जवळ चिंचवड ( चिंचवड वाहतूक पोलिस कार्यालयते दुर्गा कॉर्नर चिंचवड नाला तसेच ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत लक्ष्मीनगर माणिक कॉलनी नाला, प्रेमलोक पार्क एस.के.एफ कंपनी जवळचा नाला, आकुर्डी रेल्वेस्टेशन रोड या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी आज करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button