माझ्या विजयात ‘टीम पिंपरी-चिंचवड’चा मोलाचा वाटा असेल : संग्राम देशमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/113611f7-a3e4-43e1-8e51-bb2117177edf.jpg)
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
भाजपा नगरसेवक, पदाधिकारी यांना प्रदेशाध्यक्षांचे मार्गदर्शन
पिंपरी । प्रतिनिधी
माझ्या विजयात ‘टीम पिंपरी-चिंचवड’चा मोलाचा वाटा असेल. हा विजय भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर होईल, असा विश्वास पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी सायंकाळी काळभोर नगर येथे झाली. यावेळी निवडणूक प्रचार यंत्रणा आणि नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, प्रदेश महिला अध्यक्षा उमाताई खापरे, पुणे पदवीधर निवडणूक प्रमुख राजेश पांडे, सचिन पटवर्धन, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे प्रदेश सचिव अमित गोरखे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, राजेश पिल्ले, महिला आघाडी अध्यक्षा उज्वला गावडे, एकनाथ पवार, रवी अनासपुरे, सुनील कर्जतकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस विजय फुगे यांनी केले.
‘रेकॉर्ड ब्रेक’ मतदार नोंदणीबाबत सत्कार…
बैठकीत प्रचाराचे पुढील नियोजन व प्रचार यंत्रणा याबाबत सविस्तर माहिती प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी दिली. स्वतः उमेदवार संग्राम देशमुख यांनी माझा विजय हा भाजप कार्यकर्त्यांच्या बळावरच होईल आणि त्यात पिंपरी-चिंचवडच्या टीमचा मोलाचा वाटा असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. मतदार नोंदणी अभियानात पिंपरी चिंचवड शहराने केलेल्या रेकॉर्ड ब्रेक नोंदणी बद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उमेदवार संग्राम देशमुख यांच्या हस्ते भाजप जिल्हा जिल्हा नोंदणी प्रमुख संघटन सरचिटणीस अमोल थोरात, पिंपरी विधानसभा नोंदणी प्रमुख सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, चिंचवड विधानसभा नोंदणी प्रमुख सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, भोसरी विधानसभा नोंदणी प्रमुख सरचिटणीस विजय फुगे या टीमचा आवर्जुन सत्कार करण्यात आला.