breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या माध्यमातून नगरसेवकांचा दारोदारी प्रचार

  • खर्च पालिकेचा अन् प्रचार भाजप नगरसेवकांचा
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार
  • शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांचा इशारा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोविड 19 च्या जीवघेण्या संकटातून पिंपरी-चिंचवडकरांची सुटका करण्यासाठी राज्य सरकार ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या शरिरातील तापमान, ऑक्सिजन पातळी तपासली जात आहे. यातून कोविडमुक्त पिंपरी-चिंचवड करण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संकल्प आहे. मात्र, सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांकडून या अभियानाला गालबोट लावण्याचा प्रकार होत आहे. अभियानाच्या आडून नगरसेवकांनी घरोघरी स्वतःचा प्रचार सुरू केला आहे. भाजप पक्षनेत्यांच्या प्रभागातच यासंबंधीत सर्वाधिक तक्रारी आहेत. हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राज्य सरकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून हे अभियान राबवित आहे. महापालिकेने स्वयंसेवक तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी १५ सप्टेंबरपासून घराघरांना भेटी देत आहेत. प्रत्येक नगरसेवकांवर स्वयंसेवक नेमून हे काम करवून घेण्याची जबाबदारी दिली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबवून संपूर्ण शहरातील नारिकांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, काही नगरसेवकांच्या स्वार्थी भूमिकेमुळे या महत्वाकांक्षी अभियानाचा अवमान होत आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक या अभियानाचा गैरफायदा घेऊन घराघरात त्यांच्या नावाचा ‘जय जयकार’ करत असल्याचा आरोप संतोष सौंदणकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे पक्षनेते यांच्या प्रभागातच स्वयंसेवक त्यांचे नाव घरोघरी सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारच्या अभियानाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणे म्हणजे “आयजीच्या जीवावर बायजी उदार’’, असाच प्रकार असल्याची टिका सौंदणकर यांनी केली आहे.

स्वयंसेवकांमध्ये बहुतांशी युवकांचा समावेश आहे. त्यातील बरेच युवक हे त्या-त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांचे कार्यकर्ते आहेत. केवळ नगरसेवकांच्या शिफारशीमुळेच त्यांना या योजनेत सहभागी होता आले आहे. हे स्वयंसेवक प्रभागात घरोघरी भेटी देऊन नागरिकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासत आहेत. मात्र, स्वयंसेवकांवर संबंधीत प्रभागातील नगरसेवकांचे नाव सांगण्याची सक्ती केली जात आहेत. यामुळे अभियानाचा हेतू बाजुला राहून नगरसेवकांच्या नावाचा प्रचार जोमात सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सोशल मीडियावद्वारे देखील याचे ब्रँण्डिंग केले आहे. स्वयंसेवकांना महापालिका एका घराला 30 रुपये मानधन देते. जर पालिका हे मानधन देत असेल तर स्वयंसेवकांमार्फत नगरसेवकांचा प्रचार करून अभियानाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या अभियानाचा गैरउपयोग केला जात आहे, अशी खंत सौंदणकर यांनी प्रसिध्दीपत्रकात व्यक्त आहे.

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांची आहे. शहरातील प्रत्येकाची अभियानाद्वारे तपासणी झाली पाहिजे. लक्षणे आढळणा-या व्यक्तींना तत्क्षणी आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. मात्र, नागरिकांची तपासणी करण्यासाठी घरोघरी भेटी देत असताना “आम्हाला संबंधित नगरसेवकांनी पाठविले आहे”, असे सांगण्याची स्वयंसेवकांना सक्ती केली जात आहे. त्यामुळे अभियानाला गालबोट लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

मा. संतोष सौंदणकर, शिवसेना संघटक, चिंचवड विधानसभा
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button