breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानाद्वारे आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानाद्वारे निदर्शनास आलेल्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांना मोफत उपचार करावेत, अशी मागणी नागरिक रमेश वाघेरे यांनी केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात रमेश वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालयात उपचार घेणा-या कोविड बाधित रुग्णांना बाहेरून इंजेक्शन आणि अन्य औषधे आणण्यासाठी सांगितले जात आहे. या रुग्णांना मोफत उपचार करावेत. तसेच, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाद्वारे निदर्शनास आलेल्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांना मोफत उपचार करावेत. त्यांच्याकडून एक रुपया देखील वसूल करू नये, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button