breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माझा बाप…हाच माझा वस्ताद…आमदार महेश लांडगे यांची ‘भीमगर्जना’

  • विधानसभा निवडणूक निकालानंतर किसनराव लांडगे भावूक
  • भोसरीत महेश लांडगे समर्थक कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोश

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

माझा बाप…हाच वस्ताद हाय…अशी भीमगर्जना आमदार महेश लांडगे यांनी केली. निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड जल्लोषात आपल्या वडीलांना खांद्यावर घेत लांडगे यांनी आपल्या खास शैलीत शड्डू ठोकले. तसा एक ‘व्‍हीडिओ’ आता ‘सोशल मीडिया’वर तुफान ‘व्‍हायरल’ झाला आहे.

भोसरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवार मातब्बर असल्यामुळे ही लढत अतितटीची होणार, असे चित्र होते.  पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘पैलवान’ अशी ओळख लांडगे यांनी निर्माण केली आहे. त्याला सडेतोड उत्तर देत विलास लांडे यांच्या समर्थकांनी राजकारणातील ‘वस्ताद’ असा राडा ‘सोशल मीडिया’वर केला होता.

‘पैलवानाला सांगा…वस्ताद आलाय…’ हा प्रचार भोसरीत चांगलाच गाजला. पैलवान आणि वस्ताद अशी जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मात्र, माझ्या राजकीय जीवनात माझे वडील हेच माझे वस्ताद आहेत, असे महेश लांडगे यांनी जाहीर सभेत सांगितले होते.

दरम्यान, महेश लांडगे यांना राजकारणात लांडे यांनीच आणले. लांडेंनी मदत केल्यामुळेच लांडगे पहिल्यांदा  नगरसेवक झाले. त्यांनी ताकद दिली म्हणून लांडगे मोठे झाले…त्यामुळे लांडगेंचे वस्ताद लांडे आहेत, असा प्रचार जोरात होवू लागला होता. शेवटी कोणत्याही पैलवानावर वस्ताद भारी पडतोच…असा दावा केला जात होता.

मात्र, निवडणुकीत महेश लांडगे यांनी मैदान मारले. पैलावान मैदान मारले की, गगनभेदी शड्डू ठोकतो…तसा आमदार लांडगे यांनीही ठोकला. प्रचंड उत्साह आणि जल्लोषात लांडगे आपल्या घरासमोरीत मैदानात आले. याठिकाणी त्यांचे वडील किसनराव लांडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावर महेश लांडगे यांनी आपल्या वडिलांना चक्क खांद्यावर घेतले आणि ‘माझा बाप हाच माझा वस्ताद आहे’…असा नारा दिला. विशेष म्हणजे, यावेळी मैदान मारल्याचा आनंद आणि खुन्नसही महेश लांडगे यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आपल्या खास शैल्लीत शड्डू ठोकून लांडगे यांनी वडिलांचे आशिर्वाद घेतले. किसनराव लांडगे यांच्या चेहऱ्यावरही आपला पट्टा दुसऱ्यांचा आमदार झाल्याचे समाधान दिसत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button