माजी स्वीकृत नगरसेवकांसह सात जणांवर गुन्हा दाखल
![Illegal possession of the house; Crime filed against 24 including former corporator](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/crime-logo-807_202008478507.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई केली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात आली.
कुणाल दशरथ लांडगे (वय 36 रा. कासारवाडी), असे माजी स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे. यासह अप्पाशा इरप्पा शिवशरण (वय 42, रा. शितोळेनगर, सांगवी), शंकर खंडू दुनघव (वय 49, रा. शांतीनगर, भोसरी), किशोर नामदेव बाबर (वय 51, रा. रेल्वेगेटखाली, कासारवाडी), गणेश भीमराव वाघोडे (वय 32, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी), देवराज धोंडिबा पाचंगे (वय 35, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), मुरली शिवाजी उजगरे (वय 51, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
कासारवाडी गावठाणातील सर्जा हॉटेलच्यामागील कौलारू घरात शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. तर कुणाल लांडगे तीन पत्ती नावाचा जुगाराचा क्लब चालविताना आढळून आला असून त्यांच्याकडून 36 हजार 660 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा, साथीचा रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.