माजी महापौर राहूल जाधव यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांची कोविड तपासणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/WhatsApp-Image-2020-07-18-at-6.00.37-PM.jpeg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये परत एकदा टाळे बंदी लागू करून सुद्धा कोरोनाचा वाढता प्रभाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. जाधववाडी परिसरातील नागरिकाना कोरोनाची महागडी तपासणी करणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर माजी महापौर राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी सतत पाठपुरावा करून प्रभागातील नागरिकांसाठी कोरोनाची मोफत तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरात तब्बल २०० लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली.
या कोरोना संकटामध्ये सामाजिक बांधिलकी जपत राहुल जाधव यांच्या माध्यमातुन अनेक विविध सुविधा प्रभागातील नागरिकांसाठी पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये निर्जंतुकीकरण कारणे, प्रभागातील लोकांना मोफत जेवण वाटप करने, मोफत किराणा समान वाटप कारणे इ. सेवा नागरिकांसाठी पुरवण्यात आल्या आहेत. या कोरोनाचा सामना करत असतना जाधव यांनी जनतेशी आपली बांधिलकी जपत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली अहोरात्र प्रभागातील जनतेला मदत पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल जाधव म्हणाले की, लोकांनी कोरोनाला घाबरून न जाता स्वतच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. तसेच, सामाजिक अंतर पाळावे तसेच मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. तसेच, गरज नासताना घराबाहेर पडू नये. प्रशासनाने घालून दिलेले नियम वेळोवेळी पाळावेत. शक्यतो सर्वांनी घरीच थांबावे. नागरिकांना कुठलीही समस्या असेल तर आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.