breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांना अभिवादन

पिंपरी | महाईन्यज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर तुषार हिंगे व नगरसदस्या सुमन पवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुमन पवळे, शारदा सोनवणे, माजी नगरसदस्या उमा खापरे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button