breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज नेल्याने राष्ट्रवादीला धक्का

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसताना भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून चार नामनिर्देशन पत्र घेतले आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत तीन उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून नेले आहेत. तर, माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडून चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र, लांडे यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र नेल्यामुळे चर्चेचा विषय होत आहे.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 4 ऑक्टोबर आहे. त्यातच 2 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी आल्याने त्यातील एक दिवस कमी झाला आहे. त्यामुळे आज भोसरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. मात्र, विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज नेल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button