breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मागासवर्गीय अधिका-यावर स्थायीकडून अन्याय; सभागृहाबाहेर आंदोलनाचा इशारा

वंचित बहूजन युवा आघाडीचा इशारा, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवारांकडे दिले पत्र

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांना वित्तीय अधिकार प्रदान करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने चार महिने झाला तहकूब ठेवला आहे. स्थायी समितीकडून मागासवर्गीय अधिका-यांवर अन्यायकारक वागणूक दिली जात असून त्याच्या निषेधार्थ स्थायी समिती सभागृहाबाहेर येत्या (बुधवारी) आंदोलन करु, असा इशारा वंचित बहूजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी दिला आहे.

याबाबत महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांना वित्तीय (आर्थिक) अधिकार देण्याचा आदेश 28 फेब्रुवारी 2019 रोजी दिला आहे. त्यानूसार नगरसचिव विभागाकडे देखील पत्र दिले आहे. तसेच 25 सप्टेंबर 2019 रोजी डाॅ. पवन साळवे यांना आर्थिक अधिकार देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेच्या विषय पत्रिकेवर दाखल झाला. मात्र, गेल्या चार महिन्यापासून हा प्रस्ताव तहकूब ठेवला जात असून मागासवर्गीय अधिका-यांना जाणूनबूजुन डावलल्यांचा आरोप स्थायी समिती सभापतींवर करण्यात आला आहे.

दरम्यान, मागासवर्गीय अधिका-यांवर अन्यायाच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (दि.12) स्थायी समिती सभागृहाबाहेर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून पानपाटील यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button