breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी  : तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडून तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर अरुण राठोड (वय १९), बाबासाहेब वसंत राठोड (वय २१), भीमराव नरसप्पा जाधव (वय २२, रा. तिघेही काळाखडक झोपडपट्टी वाकड ), सागर चंद्रकांत घुगे (वय २२, रा रघुनंदन कायार्लायशेजारी, ताथवडे) या चौघांना पोलिसांनी मांडुळासह वाकड येथील मुंजोबा मंदिराच्या मागे अटक केली आहे. याबाबत महिती अशी वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत दिवसा घटफोडी,चोरी, वाहनचोरी व सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा यासाठी खाजगी वाहनाने गस्त घालत असताना पोलीस नाईक राजेश बारशिंगे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की मुंजोबा वसाहत येथील मुंजोबा मंदिरामागे मांडूळ नावाच्या सापाची विक्री करण्यास येणार आहेत.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक हरीष माने व तपास पथकातील कर्मचारी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तीन इसम संशयितरित्या थांबल्याचे दिसले. तर यापैकी एकाच्या हातात पोते होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली व पोत्याची पाहणी केली असता त्यात तीन मांडूळ आढळून आली. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते  मांडूळ त्यांनी विकण्यासाठी आणल्याचे कबूल केले.  सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने, राजेश बरशिंगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, भैरोबा यादव, विजय गंभीरे, श्याम बाबा यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button