breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महिलेसमोर अश्लिल चाळे करणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महिलेसोर अश्लि चाळे करुन विनयभंग केल्याने एका ३९ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ३९ वर्षीय इसम आणि पीडित ३४ वर्षीय महिला हे दोघे मोशीत एकाच परिसरात राहतात. सप्टेंबर २०१८ पासून आरोपी इसम हा महिलेसमोर अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग करत होता. मात्र भितीपोटी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने शनिवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.