महावितरण प्रशासनाविरोधात उद्या भाजपाचे ‘टाळा ठोको व हल्लाबोल’ आंदोलन
पिंपरी-चिंचवड शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती
राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयांवर धडकणार
पिंपरी । प्रतिनिधी
महावितरण प्रशासनाने राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड भाजपाचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी गाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ असलेल्या महावितरण कार्यालयावर उद्या, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता धडक देण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी भाजपाचे शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाड्या व मोर्चे यांचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले आहे.