breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरणचा भोंगळ कारभार : उद्योजकाला साडेआठ कोटीचे १ महिन्याचे बिल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड मधील उद्योजकांना सध्या महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .अनेक वेळा अनेक कारणामुळे वीज पुरवठा बंद राहतो , लॉक dawn नंतर पुन्हा उद्योग सुरु केल्यावर सुद्धा महावितरण चा कारभार सुधारत नाही ,वीज पुरवठा बंद झाल्याची साधी तक्रार करण्यासाठी फोन केल्यास फोन सुद्धा महावितरण कार्यालयात उचलला जात नाही .

पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे सभासद श्री.बाबू यांचे पेठ क्रमांक १० मध्ये साई प्रोफाइल नावाने कंपनी असून त्यांना दर महा १ ते १.५ लाख पर्यंत वीज बिल येते महावितरणने त्यांना मे- २०२० या महिन्याचे बिल आठ कोटी पाच लाख (रु.८००५८९८५०) दिले आहे . लॉक dawn नंतरच्या काळात एवढे काम नसताना एवढा वीज वापर होणे शक्य नाही हे अडाणी माणसाला सुद्धा कळते ते महावितरणच्या बिलिंग विभागाला कळत नाही का ? तसेच बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कर्मचारी तातडीने हजर होऊन बिलासाठी तगादा लावतात .

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे या प्रकाराबाबत म्हणाले कि सदर प्रकारात संघटनेतर्फे वरिष्ठ महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला जाईल .तसेच अनेक ठिकाणी पावसाळ्या पूर्वीची दुरुस्तीची कामे झाली नाहीत त्यामुळे पावसाळ्यामध्ये वीज खंडित होण्याचे ,केबल नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढणार आहेत ,महावितरणने प्रत्यक्ष वीज मीटर चे रीडिंग घेऊन बिल दिले पाहिजे त्यामुळे अश्या चुका होणार नाहीत .सदर उद्योजकाला तातडीने बीज बिल दुरुस्त करून दिले पाहिजे जर महा वितरण ने आपला भोंगळ कारभार सुधारला नाही तर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटने तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री.बेलसरे यांनी यावेळी दिला .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button