breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे पुरोगामी विचारांचा विजय – सचिन साठे


पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हा फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा विजय आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य विधानसभा कॉंग्रेस गटनेता म्हणून कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. आ. थोरात यांची निवड म्हणजे कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसची बैठक बुधवारी (दि. 27 नोव्हेंबर) प्राधिकरण आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी साठे बोलत होते. या बैठकीत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी तसेच प्रदेश अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव माजी महापौर कविचंद भाट यांनी मांडला. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवार (दि. 25) पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्याविरोधात महापालिकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.2 डिसेंबर) शहर कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, निगार बारस्कर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, टि.व्ही. उन्नीकृष्णन आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत भाजपा हुकूमशाही व दडपशाही पध्दतीने सरकार स्थापन करु इच्छीत होते. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने संविधान स्थापनेच्या दिनादिवशीच दिलेल्या निकालाने लोकशाही न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास आणखीनच दृढ झाला. भाजपा ज्या पध्दतीने देशभर नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करीत आहे. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासन स्थानिक नागरिकांचे हक्क डावलत आहे.

स्वागत वसिम इनामदार, आभार विशाल कसबे यांनी मानले.

सोमवारी काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा

शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही शहरभर सोमवार पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. स्वच्छ, मुबलक पाणी मिळणे हा करदात्या नागरिकांचा हक्क आहे. तो त्यांना मिळवून देण्यासाठी शहर कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. 2 डिसेंबर) सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महापालिका भवनापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन साठे यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button