Breaking-newsमुंबई

तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

मुंबई- तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आज मुंबईतील अंधेरी, एस.व्ही. रोडसह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. ईडीने केलेल्या छापेमारीत कोणती महत्वाची माहिती, कागदपत्रे हाती लागली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला होता. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मरकझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले होते. पैश्यांच्या अफरातफरी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबईतही ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button