breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र केसरी पै. बालारफीक शेख यांचा 11 लाखाचे इनाम देऊन सन्मान

  • नांदेड सिटी पुणे येथील “घुले पाटील परिवारा”तर्फे सन्मानाचे आयोजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नुकतेच जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अजिंक्यवीर ठरलेला पैलवान बालारफिक शेख याचा नांदेड सिटी पुणे येथील “घुले पाटील” परिवार यांच्याकडून 11 लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

सोमवारी (दि. 14) नांदेड सिटी पुणे येथील सदर कार्यक्रमाचे आयोजन “घुले पाटील” परिवार यांनी केलेले आहे. पैलवान बालारफिक शेख हा अत्यंत गरीब कुटुंबातील पैलवान असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी कुस्तीसारख्या खेळात यश मिळवून दाखवले. गरिबीचे भांडवल न करता त्याने कष्ट, मेहनत यावर विश्वास ठेवून यश संपादन केले. त्याच्या या कर्तुत्वाची कदर म्हणून घुले पाटील परिवार नांदेड सिटी यांच्यामार्फत त्याला 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती घुले पाटील परिवाराने दिली आहे.

सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कुस्ती निवेदक पैलवान शंकर पुजारी कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button