breaking-newsपिंपरी / चिंचवड

महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू

  • माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांचा विश्वास

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देऊ, असा विश्वास माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी व्यक्त केली.

युवासेना पिंपरी विधानसभा व आरपीआय युवक आघाडीची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आण्याचा निर्धार केला. युवासैनिक आणि आरपीआयच्या युवकांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करून प्रचाराचा वेग वाढवा. घरोघरी जाऊन आपल्या उमेदवाराने केलेल्या कामाचा लेखाजोखा पिंपरी विधानसभेतील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवावा, असेही सोनकांबळे म्हणाल्या.

यावेळी युवती अधिकारी प्रतिक्षा घुले, पिंपरी विधान सभा उपाध्यक्ष आकाश सोनवणे, सागर ससाणे, विभागसंघटक निलेश हाके, संदीप तोरणे, विकास गायकवाड, रवी नगरकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button