breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापौर आपल्या दारी उपक्रमातून राहूल जाधव यांच्या गाठीभेटी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणा-या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर राहूल जाधव यांनी महापौर आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. शहराच्या विविध भागात जाऊन तेथील नागरिकांच्या घरी भेट देऊन महापौर जाधव हे त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
महापौर राहुल जाधव यांनी आज बो-हाडेवाडी, आल्हाट वस्ती, विनायक नगर, संजय गांधीनगर येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली. त्यामध्ये प्रशासकीय पाठपुराव्याअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.