breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैर म्हणतात… मानदंडाच्या सुरक्षेसाठी सभागृहाच्या रचनेत बदल

शिवसेना गटनेते राहूल कलाटेंचा सभागृह रचनेतील बदलावरुन आयुक्तांना विचारणार जाब

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महापाैरांचा आसनासमोरील मानदंड विरोध वारंवार उचलण्याचा प्रयत्न करतात. मागील महासभेत मानदंड उचलल्याने भाजपने सभा तहकूब केली होती. त्यामुळे विरोधकांना मानदंडाला हात लावता येवू नये, अशा प्रकारे सभागृहात महापाैरांच्या हाैदासमोरील रचना बदलण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी आक्षेप नोंदविला असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपच्या विद्यमान महापाैर उषा ढोरे ह्या यापुर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेत स्थायी समिती सभापती, उपमहापाैर ही पदे भूषविली आहे. सध्या त्या भाजपकडून महापाैर बनल्या आहेत. ढोरे या महापाैर झाल्यानंतर पहिल्याच महासभेत प्रचंड गोंधळ होवून त्यांच्यावर महासभा तहकुब करण्याची वेळ आली होती. तसेच राष्ट्रगीत न करताच त्या थेट महापाैर दालनात येवून बसल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर महासभेत जावून त्यांनी सभा तहकूब झाल्याचे सांगून राष्ट्रगीत घेवून महासभा तहकूब केल्याचे जाहीर केले होते.

महापौरांच्या डिसेंबर महिन्याची तहकूब सभा 6 जानेवारीला पार पडली. यावेळी सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोरील राजदंड उचलला होता. भाजपवर सभा तहकुबीची नामुष्की ओढाविली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजपने महापौरांच्या हौदासमोरील फर्निचरची रचनाच बदलली आहे. नगरसेवकांना मानदंडाला हात लावताच येणार नाही, अशी रचना करुन घेतली आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, महापौरांसमोरील हौदात मानदंडाला हात लावू नये म्हणून अचानक रचनेत बदल केला आहे. सर्व विरोधक मानदंड उचलून सभागृहात आंदोलन करुन आपल्या मागणीकडे महापाैरांचे लक्ष वेधतात. लोकशाहीत हे विरोधकांचे आयुध आहे. त्यावर भाजपकडून छेद दिला आहे. मानदंडापर्यंत पोहचू नये अशी रचना केली आहे. महिला महापौर ढोरे यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा घाट आमदारांकडून घातला जात आहे.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, राजदंडाची सुरक्षा राहावी, विरोधकांनी तो पळवू नये याकरिता मी स्वत: उभे राहून फर्निचरचे काम करुन घेतले आहे. राजदंड चमकला पाहिजे. चांगला दिसायला पाहिजे. त्याला चकाकी असावी म्हणूच आम्ही हा बदल केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button