breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेने एक ट्रक भाजीपाला इस्काॅनला केला सुपूर्द

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात लाॅकडाऊनमुळे भोजन व अन्नधान्य घेवू न शकणाऱ्या मजूर व कामगारांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थाकडून सहाय्य करण्यात येत असून त्याअंतर्गत प्राप्त झालेल्या एक ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य इस्काॅनच्या अन्नछत्रासाठी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

चिंचवड महानगरपालिकेने शहरात अकरा ठिकाणी उभारलेल्या निवारा केंद्रांच्या सह विविध भागांत अन्नधान्य उपलब्ध नसणाऱ्या व जेवणाची व्यवस्था नसणाऱ्या नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन विविध सेवाभावी संस्थांना केले होते. त्या अन्वये अनेक संस्थांनी इंद्रायणीनगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात साहित्य जमा केले आहे. त्या आवाहना अंतर्गत प्राप्त एक ट्रक भाजीपाला आज इस्काॅन संस्थेकडे सूपूर्त करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे ओमप्रकाश बहीवाल आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button