breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत अधिकारी-कर्मचा-याच्या लवकरच बदल्या

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेत अधिकारी व कर्मचा-यांची बदलीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधा-यांच्या मदतीने इच्छित बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकारी व कर्मचा-यांकडून मागविलेल्या बदलीच्या प्रस्तावाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत साडेसात हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. बांधकाम परवाना, नगररचना, स्थापत्य या विभागात नियुक्ती मिळावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील असतात. तर काही कामचुकार अधिकारी पाणीपुरवठा, करसंकलन अशा विभागांत नियुक्ती मिळू नये, यासाठी प्रयत्नशील असतात. अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदलीमागे मोठे अर्थकारण असते. तसेच नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचे कामही केले जाते. सोयीच्या जागांवर नियुक्ती मिळावी, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करतात. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र, तसेच वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचा-यांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने २२ जानेवारीला काढले होते.

यामध्ये गट अ ते क मधील अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचा-यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार गट अ मधील एका अधिका-याने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर गट ब मधील तीन आणि क मधील कर्मचा-यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गट ड मधील सोळा कर्मचा-यांचा समावेश आहे.

दरम्यान, विभागप्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या सर्व अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणारे अधिकारी व कर्मचा-यांची अन्य विभागांत बदली केली जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. पालिका प्रशासनातर्फे गेल्या आठवड्यात उपअभियंता आणि अभियंता संवर्गातील अधिकारी कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही बदल्या होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button