breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील 149 अधिकारी-कर्मचा-यांचे बदलीसाठी अर्ज

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचा-यांकडून मागविलेल्या बदलीच्या प्रस्तावाला थंडा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार मधील बदल्यांसाठी एकूण 149 अधिकारी व कर्मचा-यांचे अर्ज प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे वर्ग एक मध्ये एकाच अधिका-यांने बदलीस प्रशासनास विनंती केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचा-यांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने 22 जानेवारी रोजी काढले आहे.

यामध्ये गट ‘अ’ ते ‘क’ मधील अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. 31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचा-यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार वर्ग एक मधील एका अधिका-याने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर, वर्ग दोन मधील 52, वर्ग तीन मधील 64 आणि वर्ग चार मधील 23 कर्मचा-यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणा-या कर्मचा-यांची बदल्या केल्या जाणार आहेत.

दरम्यान, महापालिकेतील उपअभियंता 1, कार्यालयीन अधिक्षक 4, मुख्य लिपिक 19, लिपिक 36, उपलेखापाल 2, सहायक भांडारपाल 3, आरोग्य निरीक्षक 5, वीज पर्यवेक्षक 1, प्लंबर 1, स्टाफनर्स 4, लॅब टेक्निशियन 1, लघुलेखक 2, तारतंत्री 2, वाहन चालक 4, एम.पी.डब्लू 1, मोटार पंप आपरेटर 3, कनिष्ठ अभियंता 18, काॅम्प्युटर आपरेटर 4, वीजतंत्री 1, फार्मासिस्ट 1, आरेखक 1, शिपाई 14, मजूर 9 अशी एकूण वर्ग एक ते वर्ग चार मधील 149 जणांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button