breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील लिफ्टमधील तांत्रीक बिघाड दुरूस्त करावा

महापौरांच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी – महापालिका मुख्यालयातील लिफ्टमधील तांत्रीक बिघाडामुळे महापौर नितीन काळजे यांना जवळपास पंधरा मिनीटे मनस्ताप सहन करावा लागला. त्यावर महापौर काळजे यांनी स्वतंत्र पत्र देऊन पालिका प्रशासनाला या लिफ्टबरोबरच मुख्यालयातील अन्य लिफ्ट देखील तांत्रीक दृष्ट्या दुरूस्त करण्यात याव्यात, अशी सूचना केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिफ्ट तांत्रिक बिघाडामुळे वारंवार बंद होतात. चार दिवसांपूर्वी महापौर काळजे यांच्यासह काही नगरसेवक लिफ्टने वर जात असताना मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली. त्यावर पंधरा मिनिटे महापौरांसह नगरसेवकांना ताटकळत उभारावे लागले. लिफ्ट दुरूस्त करणारी यंत्रणा कुचकामी असल्यामुळे महापौरांवर ही वेळ आल्याने त्यांनी स्वतः याची दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्टची दुरूस्ती करण्याचे पत्र आयुक्त हार्डीकर यांना दिले आहे.

पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दष्टीने पालिकेतील सर्व लिफ्टची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी. बदलण्यायोग्य असतील तर त्या लिफ्ट बदलून घ्याव्यात, अशीही सूचना काळजे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button