breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील बोगस ‘एफडीआर’ रॅकेट उघड; स्थापत्यचे मोठे ठेकेदार गळाला

स्थापत्य, पाणीपुरवठा, जल:निस्सारण, आरोग्य, विद्युत, पर्यावरण विभागात सखोल चाैकशी सुरु

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात विकास कामे ठेकेदार करीत असतात. मात्र, मागील काही वर्षात ठेकेदारांची वाढलेली स्पर्धेमुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे. तसेच सर्वात कमी दराने निविदा भरणा-या ठेकेदारांची संख्या वाढली आहे. त्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून महापालिकेकडे दिलेले FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) स्थापत्य विभागात 7 मोठ्या ठेकेदारांची बोगस आढळून आले आहे. त्यात स्थापत्यचे मोठे ठेकेदार गळाला लागल्याने त्यांच्यावर फाैजदारी कारवाईची दाट शक्यता आहे. दरम्यान, पालिकेच्या सर्वच विभागात जून्या विकास कामांच्या फाईल्सची कसून तपासणी करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, जल:निस्सारण, आरोग्य, विद्युत, पर्यावरणासह अन्य विभागात FDR प्रकरणी सखोल चाैकशी सुरु आहे. महापालिकेतील ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे की खरे याबाबत बॅंकाकडे खातरजमा करण्यात येत आहे. महापालिकेला खोटे व बोगस FDR बनवून देणारी टोळी शहरात कार्यरत असल्याने जून्या विकास कामांच्या फाईल्सच्या FDR ची सखोल चाैकशी सुरु आहे.

महापालिकेच्या विकास कामांच्या फाईल्समधील FDR ठेकेदारांना परस्पर देवून काढून घेतल्याचे समोर येवू लागले आहे. या प्रकरणात ठेकेदार आणि काही अधिकारी यांचे संगनमत दिसून येत आहे. महापालिका ठेकेदार काम मिळविण्यासाठी कमी दराने निविदा भरतात. एकच ठेकेदाराकडे दहा ते पंधरा विविध विभागातील कामे सुरु असतात. सर्व कामांना लाखो रुपये एफडीआर ठेकेदाराकडे येतो कुठून? या प्रकरणी चाैकशी करण्यात येत आहे. स्थापत्यसह हजारो कामासाठी मनपा टेंडर मागवित असतात. या कामासाठी निविदांमध्ये स्पर्धा होऊन २०, २५, ३०, ३२ टक्के नव्हे तर 46 टक्के कमी दराने निविदा ठेकेदार भरतात. ते काम मिळवितात.

काम मिळाल्यानंतर PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट ) देणे बंधनकारक आहे. अनेकजण मोठया रक्कमा बँकेकडे ठेवून ठेव पावती अथवा डीडी स्वरूपात FDR मनपाकडे जमा करण्यात येते. जमा केलेला FDR खोटा की खरा याविषयी अधिकारी कधीही खात्री अथवा तपासणी करत नाहीत. त्याच्याच फायदा अनेक ठेकेदार घेवू लागले आहेत.

महापालिकेच्या अनेक विकास कामांमध्ये बनावट FDR तयार करून देणारी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे ठेकेदार बनावट FDR मनपाकडे जमा केल्याचे निर्दशनास येत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर फाैजदारी कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यानूसार सर्व विभागात कसून चाैकशी सुरु असताना स्थापत्य विभागातील सात मोठे ठेकेदार गळाला लागले आहे. त्यामुळे अन्य सर्वच कामाची चाैकशी सुरु आहे. पालिकेच्या अन्य विभागात देखील अनेक बोगस एफडीआर आढळून येण्याची दाट शक्यता आहे. त्यानूसार सर्व कामांतील फाईल्सची तपासणी करण्यात येत आहे.

करोडो रुपयांचा घोटाळा उघड होईल – आमदार बनसोडे

महापालिकेतील ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे की खरे तपासणी करावी, महापालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावा, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. तसेच तसेच या प्रकरणाची निष्पश चाैकशी केल्यास पालिकेचा करोडो रुपयांचा घोटाळा उघड होईल, असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button