महापालिकेतील तीन उपअभियंत्यांना पदोन्नती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/PCMC-New.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेतील स्थापत्य विभागातील उपअभियंता विशाल कांबळे, रवींद्र पवार आणि राजेंद्र राणे यांना कार्यकारी अभियंतापदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यकारी अभियंता अभिनामाची 18 पदे मंजूर आहेत. या संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी 4 व 19 सप्टेंबरला पदोन्नती समितीची सभा झाली. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील 29 डिसेंबर 2017 च्या मार्गदर्शनानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार निर्णय घेण्यात झाला. विशाल कांबळे आणि रवींद्र पवार यांना अनुक्रमे पाणीपुरवठा व जलनि:सारण मुख्यालयात व राजेंद्र राणे यांना बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग देण्यात आला आहे.