Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेच्या 32 सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचा-यांचा महापाैरांच्या हस्ते सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/DSC_5916-copy.jpg)
पिंपरी – महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 20 तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 12 अशा एकूण 32 अधिकारी व कर्मचा-यांचा आज महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुस्तक, गुलाबाचे फूल व स्मृतिचिन्ह, तसेच सेवाउपदान अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
महापालिका स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार आदी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी अशोक बोनगीर, कनिष्ठ अभियंता विजय गांधी, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड, सहा.उद्यान अधीक्षक बबन भोसले, कार्यालयीन अधीक्षक औदुंबर तुपे, सुनंदा शिंदे, मुख्य लिपिक कौसल्या पायगुडे, लिपिक दत्तात्रय तिकोणे, वाहन चालक किसन जाधव, बाळु शेंडगे, काळुराम तापकीर, अर्जुन तापकीर, वीजतंत्री चांगदेव गाडेकर, जगन्नाथ दरदरे, मजूर अशोक कदम, शिपाई जनार्दन भोसले, फायरमन गुलाबराव भालेकर, आरोग्य कर्मचारी बापू निकाळजे, दिलीप सकटे, बेबी चव्हाण. तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये शिपाई कैलास जाधव, आरोग्य कर्मचारी मंगल गायकवाड, अरुण काळे, शैला डोळस, रोहिणी देव, गोरखनाथ माने, सिमा बिर्दा, सुभाष गायकवाड, रामदास गवारी, दत्तात्रय देवळेकर, अभिमान गायकवाड, विठठल गायकवाड यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे खुशाल पुरंदरे यांनी केले तर कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार यांनी आभार मानले.