breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शिक्षकांना बायोमेट्रीक सवलत; अनेक मशीन बंद अवस्थेत

पिंपरी |महाईन्यूज|

कामचुकार शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसविले. मात्र, संगणक विभागाच्या अनास्थेमुळे गेल्या वर्षापासून ते बंद असल्याने केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत

शिक्षण मंडळाने पाच वर्षांपूर्वी पोलस्टार कन्सल्टिंग प्रा. लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून १३० शाळांमध्ये ‘बायोमेट्रिक प्रणाली’ कार्यान्वित केली. परंतु, सध्या अनेक महिन्यांपासून ती नादुरुस्त असल्याने अनेक तक्रारी येत आहेत. त्यात अनुपस्थिती, कर्मचारी नोंदणी, वेळ चुकीची दाखविणे, बॅटरी खराब आणि उशिरा येत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. तपासणीअंती हे मशिन विविध कारणांनी वर्षभरापासून बिघडल्याचे समोर आले.

मात्र, संबंधित कंत्राटदाराने काम सोडल्याने त्याची दुरुस्ती झाली नाही. मशिन बंद असल्याचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळे अनेक जण बायोमेट्रिक हजेरी नोंदवीत नाहीत. बऱ्याचदा शिक्षक वेळेपूर्वीच निघून जातात. पूर्वी उपस्थितीची प्रिंट असल्याशिवाय पगार होत नव्हते. त्यामुळे मशिन त्वरित दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाने चार वेळा संगणक विभागास कळविले आहे, तरीही या विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. 

शिक्षकांनी संगणक विभागाशी समन्वय साधून बायोमेट्रिक मशिन त्वरित दुरुस्त करण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button